धरणाला गळती लागल्याचे कळताच मदतीचे साहित्य घेऊन पोलीस धावले पणदेरीला

0

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण विभागाला मिळताच पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग मदतीच्या आवश्यक साहित्यासह आपल्या १०० पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांना धीर दिला. पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथून जादा कुमक म्हणून १०० पोलीस अंमलदार रवाना झाले. तसेच आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य तत्काळ पोहोचविण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना धरण फुटून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पी. ए. सिस्टीम व मेगाफोनव्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्थलांतरित होण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित होण्याबाबत सांगण्यात आले. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरिता मदत करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 07-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here