मुंबई मेट्रो -3 प्रकल्पावरून अश्विनी भिडे यांची बदली

0

मुंबई मेट्रो-3 च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंग देओल हे आता मेट्रो 3 चा कार्यभार पाहतील गेल्या 1 जानेवारी रोजी भिडे यांना प्रधान सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या पुढील नेमणुकीसंदर्भात अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. अश्विनी भिडे यांची पहिली नेमणूक इचलकरंजी येथे करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यांनी साहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न त्यांनी कौशल्यानं हाताळले होते. विभागीय आयुक्त अरूण भाटीया यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांनी विकासकामांवर भर दिला. कमी खर्चात सूक्ष्म जलसिंचन करणारे रानजाई पद्धतीचे बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला. त्याला चांगले यशदेखील मिळाले होते. खात्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्यांवर त्यांनी कारवाई केली होती. त्यांच्याकडे 2014-15 मध्ये शिक्षण खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. मेट्रोची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर त्यांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार भिडे यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जातेय.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here