रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत शेतकऱ्यांनी केली ३३३ कोटी कर्जाची उचल

0

रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० च्या पंधरवड्यापर्यंत खरीप व रब्बी मिळून ३३२ कोटी ९६ लाखाच्या कजाँची उचल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपच्या तुलनेत रब्बीसाठीच्या कर्जाची टक्केवारी मात्र कमी आहे. जिल्ह्यात भात शेती आणि त्यापाठोपाठ रब्बी पिकांमध्ये प्रयोग होऊ लागले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उचल केली जाऊ लागली आहे. शेतीमधील कमी होणारे मनुष्यबळ, त्यासाठी वाढलेला खर्च, यांत्रिकीकरण, खते व अन्य गोष्टींसाठीही खर्च वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात छोट्या कर्जदारांची संख्या मोठी आहे. खरीप हंगामासाठी चालूवर्षी २५७ कोटी ७० लाख रुपयांची उचल ५३ हजार ४८६ शेतकऱ्यांनी केली. बँकांनी १११ टक्केचा लक्षांक गाठला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत कर्जाची उचल तब्बल बारा कोटीनी कमी झाली. चालू वर्षी रब्बी हंगामासाठी २८९ कोटींचे कर्जाचे उद्दिष्ट आहे. परंतु १७ जानेवारीपर्यंत रब्बी हंगामासाठी ७५ कोटी २६ लाख ९१ हजार रुपये कर्जाची उचल झाली आहे. हे प्रमाण २६ टक्के इतके कमी आहे. मागील वर्षी रब्बी हंगामासाठी १८६ कोटी २१ लाख रुपये कर्जाचे वाटप बँकांनी केले होते. आतापर्यंत खरीप व रब्बी हंगामासाठी झालेल्या कर्ज वाटपात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील ५६ हजार ७८९ शेतकऱ्यांनी ३३२ कोटी ९६ लाख ९१ हजार रुपये कर्जाची उचल केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here