मुंबके येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

खेड : तालुक्यातील मुंबके येथे खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबकेतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिबिर झाले. यामध्ये ८१ जणांनी रक्तदान केले. कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताची टंचाई भासू नये यासाठी विविध सामाजिक संस्था रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. याचाच भाग म्हणून तालुक्यातील खाडीपट्टा वेल्फ अर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबके गावातील रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी खेड खाडीपट्ट्यातील तरुणांनी प्रतिसाद दिला. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर येथील दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी केले. शिबिरात सहभागी रक्तदात्यांना अकबर दुदुके यांच्यासह अनेक ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दाऊद दुदके, बुर्हान टांके, वसीम फकी, रहीम साहिबोले यांसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 08-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here