रत्नागिरी तालुक्यांतील मजगाव मुस्लीम वाडी येथे वडाचे झाड उन्मळून आठ घरांवर कोसळले. आज सोमवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे हे झाड आज अचानक उन्मळून पडले. फैय्याज मुकादम यांच्यासह आठ घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक जिल्हापरिषद सदस्य महेश म्हाप यांच्यासह तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
