साेशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे जिल्ह्यात 3 वर्षांत फसवणुकीच्या 56 तक्रारी

0

रत्नागिरी : सध्या कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जनजागृती करूनही लोक थापांना बळी पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात साेशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फसवणूक झाल्याच्या ५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल झाल्यानंतर सात दिवसांत कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ पासून स्वतंत्र सायबर सेल सुरू करण्यात आले आहे. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींची निपटारा करण्यासाठी १ पोलीस अधिकारी व ५ अंमलदारांची टीम आहे. गेल्या तीन वर्षांत ५६ तर सहा महिन्यात सोशल मीडियावरील बनावट अकाउंटच्या २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत १८ बनावट अकाउंट सायबर पोलिसांना बंद करण्यात यश आले आहे. उरलेल्या ५ तक्रारींवर कारवाई सुरू आहे. वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात सायबर साक्षरता निर्माण व्हावी, याकरिता ‘सायबर एहसास’ उपक्रम जिल्हाभर सुरू केला आहे. फसव्या योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

बनावट अकाउंट
२०१९ १४
२०२० १९
२०२१(जून) २३

सात दिवसांनंतर होते खाते बंद
१) तक्रार केल्यानंतर सात दिवसांत खाते बंद होते.
२) सायबर सेलकडे तक्रार आल्यावर पोलीस नोटीस पाठवितात नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करतात.
३) युजरने स्वत: आपल्या अकाउंटवरून तक्रार केली, तर चोवीस तासांच्या आत बनावट खाते बंद होते.

तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर…
१) आपल्या नावाने बनावट अकाउंट दिसले, तर सर्वप्रथम अकाउंट फेक आहे की हॅक झाले आहे, याची खात्री करावी. घाबरून न जाता सायबर सेलशी संपर्क साधावा.
२) फेक अकाउंट युजर स्वत: बंद करू शकतात. युजरने स्वत: रिपोर्ट केला, तर चोवीस तासांच्या आत अकाउंट बंद होते. रिपोर्ट करण्याची प्रोसेस समजून घ्यावी.
३) फेक अकाउंटची प्रोफाइल युआरएल लिंक कॉपी करून आपल्या अकाउंटवरून तक्रार दाखल करावी. त्वरित अकाउंट बंद केले जाते.

कोरोनात वाढल्या तक्रारी
१) कोरोना काळात सायबर गुन्हे वाढले आहेत.
२) २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या तुलनेत २०२१ मध्ये बनावट अकाउंटच्या तक्रारी वाढल्या आहेत.
३) सहा महिन्यांत तब्बल २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पोलिसांसाठी वेगळे पोर्टल
१) सायबर क्राइम पोर्टल नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल या साइटवर जाऊन तक्रारदार ऑनलाइन तक्रार देऊ शकतात व ती तक्रार ऑनलाइन पोर्टलवर गेली की, ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तक्रार आहे, त्या पोलीस स्थानकात ती तक्रार दिली जाते व सायबर पोलीस तपास करतात.
२) सध्या फेसबुकवरून होणारे फसवणुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. फसवणूक टाळण्याकरिता अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये व अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नये.
३) कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व कोणतीही मागणी स्वीकारू नये.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 08-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here