…आणि भुजबळ, फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

0

नाशिक : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून केलेलं अभिरूप आंदोलन असो, किंवा पावसाळी अधिवेशनात एकमेकांसमोर भिडलेले, नडलेले राष्ट्रवादीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले, तर नाशिकमध्ये शहर बससेवा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नेते व्यासपीठावर एकत्र जमलेले पाहायला मिळाले. यावेळी व्यासपीठावर उदघाटक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ यासह गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ उपस्थित होते. यावेळी सिटीलिंक बस मोबाईल ऍप्लिकेशन, शहर बससेवा वेबसाईट, याचंही देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी ऑनलाइन उदघाटन केलं. यावेळी ‘जलनीती’ या महापौर सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं अनावरणही या उद्घाटनाच्या कार्यक्रमात करण्यात आले.

फडणवीसांच्या स्वागताचे फलक काढले –

बस सेवेच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्घाटन करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या लावलेले भाजपाचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला होता. हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हयांचा नाशिक दौरा असताना त्यांच्या स्वागताचे फलक तसेच कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत विचारला आहे.

अभिरूप विधानसभा-

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित झाल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात झाली असता भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली आहे.भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली आहे. कालीदास कोळंबकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपचे आमदार एकेएक करून महाविकास आघाडी सरकारविरोधात मत मांडत आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलणार आहे. तर दुसरीकडे विधानसभेचं कामकाज सुरू झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 08-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here