दापोली तालूक्यातील पाडले. गावातील आंबा बागायतदार कौस्तुभ लिमये यांनी यावर्षीच्या हंगामातीत पहीली आंबापेटी वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवली आहे. जिल्हयातून पहिली आंबापेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. पाडले येथील लिमये हापूस आंबा फर्मचे कौस्तुभ लिमये यांनी या वर्षीच्या आंबा हंगामातील 4 डझनाची पहिली हापूस आंबापेटी नवी मुंबईतील वाशी बाजारात योगेश सुरेश कुटे या फळविक्रीत्याकडे विक्रीसाठी पाठविली आहे.
