महागाई विरोधात काँग्रेसचे आजपासून आंदोलन

0

चिपळूण : दि. ९ ते १५ जुलै या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात विविध स्वरूपाच्या आंदोलनांच्या साखळीचे आयोजन केले आहे. त्यानुसार राज्यभरात होणाऱ्या या आंदोलनामध्ये सायकल यात्रेसह सह्यांच्या मोहिमेचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. वाढत्या महामाई संदर्भात केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर आंदोलन साखळी उभारली आहे. त्यानुसार ९ ते १७ जुलै दरम्यान विविध आंदोलने केली जाणार आहेत. प्रदेश पातळीवरून दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात शुक्रवार, दि. ९ रोजी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. १० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शहरातून सायकल यात्रा व सायकल फेरी काढून निषेध करायचा आहे. तसेच ११ ते १५ दरम्यान जिल्हाभरातील युवक संघटना, विद्यार्थी संघटना, सेवा दल, इंटक, सर्व सेल व बेसिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर जाऊन इंधन दरवाढ विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवायची आहे. प्रत्येक तालुका पातळीवर शहरातून किमान पाच हजार वाहनचालक नागरिकांच्या सह्या जमा करायच्या आहेत. दि. १२ ते १३ रोजी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किंमतीविरोधात पाच कि.मी. सायकल यात्रा काढायची आहे. तसेच महिला काँग्रेच्या वतीने गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात आंदोलन करायचे आहे, असे आदेश प्रदेश कमिटीकडून देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 09-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here