मुंबई विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या ५४-५८ किलो वजनी गटातील तायक्वांदो स्पर्धेत येथील खेड येथील आय.सी.एस. महाविद्यालयातील तेजस भैरवकर याने सुवर्णपदक पटकावले. त्याची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत महाविद्यालयातील २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुंबई येथील खालसा महाविद्यालयात स्पर्धा पार पडल्या. तेजस भैरवकर याने पहिली फाईट बिला महाविद्यालय, दुसरी फाईट सोमया महाविद्यालय, तिसरी फाईट रिझवी महाविद्यालय, चौथी फाईट नाईट महाविद्यालय, पाचवी फाईट आर.जे. सी.महाविद्यालयाविरूद्ध जिंकून निर्विवाद वर्चस्य प्रस्थापित केले. त्याला प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष हिराचंद बुटाला यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नंदकुमार गुजराथी, मंगेश बुटाला, चेअरमन अॅड. आनंद भोसले, व्हा. चेअरमन बाबा पाटणे, प्राचार्य डॉ. जी.बी.सारंग आदी उपस्थित होते.
