अगामी वर्षात आंतराळवीरांसह इस्रो करणार गगनमोहीम

0

भारताच्या आंतराळवीरांसह अवकाशयान पाठवण्याची गगनयान मोहीम 2021च्या डिसेंबरमध्ये राबवण्यात येईल, मात्र डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये विनामनुष्य यान पाठवण्यात येणार असल्याची माहती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी बुधवारी येथे दिली. मानवी अवकाशयान आव्हाने आणि वाटचाल या विषयावरील परिसंवादात सिवन बोलत होते. ते म्हणाले, मानवी अवकाश यान पाठवणे हेच केवळ गगनयान मोहीमेचे उद्दिष्ट नाही. तर मानवी उपस्थिती कायम असणारे अवकाशतील केंद्र उभारणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. गगनयान मोहीम आम्ही तीन स्तरावर राबवणार आहोत. मानवविरहीत मोहीम डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये राबवण्यात येईल. भविष्यातील गरजांचा वेध घेऊन इस्रोने बंगळुरू जवळलि संशोधन केंद्रावर संभाव्य अवकाशवीरांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याबाबत नासा आणि अन्य अवकाश संशोधन संस्थांशी चर्चा सुरू असून त्यांच्या मानवी अवकाशयान पाठवण्याच्या अनूभवाचा लाभ घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले. गगनयान ही इस्रोच्या आंतर ग्रीःय मोहिमेलाही सहाय्य करेल. आंतर ग्रहीय संशोधन ही नासाची महत्वाकांक्षी योजना दीर्घकालीन कार्यक्रम आहे, असे सीवन यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here