बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा आज वचनपूर्ती सोहळा

0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज होणाऱ्या शिवसेना वचनपूर्ती जल्लोष सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६मध्ये शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेच्या पहिल्या फळीतील ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार होईल. मुंबईतील शिवसैनिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हा दिवस वचनपूर्ती सोहळा म्हणूनही साजरा करत असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षात शिवसेनेची शक्ती सर्वांनी पाहिली आहे, असं म्हणत परबांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवेन असे वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने ते पूर्ण झाले आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here