कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात येत्या २६ जानेवारीला बेलापूर (नवी मुंबई) येथे कोकण रेल्वे मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात यापूर्वी सावंतवाडी येथे आंदोलन केले होते. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांना समस्या सोडविण्याचे आश्वाेसन दिले होते. रेल्वे प्रवाशांच्या मागण्या जाणून घेत त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांसमवेत बैठकही घेतली. त्यावेळी सर्व मागण्या ऐकून घेतल्या. परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
