हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी दिग्गजांचं विनम्र अभिवादन

0

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. त्यातच अनेक राजकीय नेत्यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनीही बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत, असं ट्विट करत मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही ट्विरवर एक व्हिडीओ शेअर करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. पूर्ण हिंदुस्थानात ज्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली. आणि आपल्या सगळ्यांना आजदेखील त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होते. मी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आदरांजली अर्पण केली आहे. बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचारांनी ऊर्जा मिळायची. अनेक लोकांनी बाळासाहेबांना फक्त टीव्हीवर पाहिलं. अनेकांना त्यांना भेटण्याची संधी देखील मिळाली नाही, तरी अशाही लोकांना एक वाक्य आणि शब्दांनी प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती. वज्रापेक्षा कडक भूमिका मांडणारे बाळासाहेब ठाकरे होते. दुसरीकडे प्रेम करणारेदेखील बाळासाहेब होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला असं वाटेल की प्रेरणा कोणाकडून घ्यावी, तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्या प्रत्येक व्यक्तीला प्रकर्षानं येत आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here