रत्नागिरी : शहराजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथून बेकायदा गावठी हातभट्टीची दारू आणि त्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी सकाळी ८.४५ वा. करण्यात आली असून रियाज अब्बास मुकादम (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी मिरजोळे-पाटिलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात धाड टाकली. तेव्हा त्यांना त्याठिकाणी गावठी दारूसह रसायन आणि इतर साहित्य आढळले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पो. उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 10-Jul-21