रत्नागिरी येथे तान्हाजी चित्रपटावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली शिवरायांची आरती

0

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चालत आहे. रत्नागिरीमध्ये या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असून २२ जानेवारीच्या दुपारच्या शो दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, हिंदू राष्ट्रसेना, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांची आरती करून ‘तान्हाजी’चा जयजयकार करण्यात आला. सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. जय भवानी, जय शिवाजी, पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम् अशा घोषणांनी राधाकृष्ण सिटीप्राइडचा परिसर दणाणून गेला. आरती, धैर्यमंत्र व प्रेरणमंत्र म्हणण्यात आला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला या चित्रपटाने वेड लावले आहे. अजय देवगणची चित्रपटात एन्ट्री होताच लोकांनी शिट्या वाजवल्या. अजय देवगण आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट ४५४० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here