आज राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

0

राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वारंवार रा. प. रत्नागिरी विभाग के नियंत्रक यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि प्रत्यक्ष भेटून देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रोजंदारी, कालावधीची ग्रॅज्युटी, बी. पी. टी.. झेड च्या व अनपेड रकमा कर्मचाऱ्यांना वेळेवर न देणे, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजेचा पगार देण्याबाबत वेळकाढूपणा करणे व प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या अर्जाना उत्तर न देणे व कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवा पुस्तकांची प्रत जाणीवपूर्वक न देणे व पेन्शन इ. ज्वलंत प्रश्रांची सोडवणूक न झाल्याने जिल्ह्यातील २ हजार सेवानिवृत्त कर्मचारी दि. २३ जानेवारी रोजी विभाग नियंत्रक रत्नागिरी यांच्या कचेरीसमोर १ दिवसांचे धरणे आंदोलन सकाळी ११ ते ५ यावेळेत करणार आहेत. या आंदोलनात सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजयराव जाधव आणि सचिव दीपक देसाई यांनी केले आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here