देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज : रामदास आठवले

0

मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने रामदास आठवले यांनी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली.

जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच, जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची माहिती मिळेल. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जनगणना आयोगासोबत सुद्धा याबाबत चर्चा करणार आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. याचबरोबर, जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदत मिळेल, असे ते म्हणाले. याचबरोबर, जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असे म्हणत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 12-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here