आरेगाव येथील तरुणाचा अंजनवेलमध्ये बुडून मृत्यू

0

गुहागर : तालुक्यातील आरेगाव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंजनवेल गावात कातळवाडी ते पेठ अंजनवेल असा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या नदीवर अनेक ठिकाणी पक्के बंधारे बांधण्यात आले आहेत. पावसाळ्यात गुहागर तालुक्यातील कॉलेज विद्यार्थी, पुरुष, महिला येथे पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. रविवार असल्याने या रस्त्यावरील अनेक बंधाऱ्यांवर पोहोण्यासाठी गर्दी झाली होती. केतन भोसलेही आपल्या मित्रांसोबत या नदीवरील एका बंधाऱ्यावर ११ जुलैला दुपारी १.३० च्या दरम्यान पोहायला गेला होता. पोहताना अचानक केतन दिसेनासा झाला. केतनच्या मित्रांनी बाजारपेठत पलापर्यंत केतनचा शोध घेतला. त्या नंतर आरेगावातील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान केतनचा मृतदेह सापडला. पस्तीशीच्या दरम्यान वय असलेल्या केतनच्या या अपघाती मृत्युमुळे आरेगावात शोककळा पसरली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here