खरंच! अवघ्या 1 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा

0

जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध होत असला तरी, देशातील सर्वांनाच तो परवडणारा नाही. यामुळे बंगळुरूमध्ये एका स्टार्टअप कंपनीने अवघ्या एक रुपयात एक जीबी डेटा अशी दणदणीत सर्व्हिस बाजारात आणली आहे. ‘वाय-फाय डब्बा’ या नावाने तीन वर्षांपूर्वी बंगळुरू येथे एक स्टार्टअप सुरू करण्यात आलं होतं. सर्वांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा पुरवण्यासाठी सर्व्हिस सुरू करण्यात आली. विश्वासार्हता आणि परवडणारी सेवा या समीकरणावर या स्टार्टअपचा जोर होता. ‘तीन वर्षांआधी म्हणजेच 2016 साली ‘वाय-फाय’ डब्बा सुरू केला, त्याआधी माईल कनेक्शन आणि किंमतीचा प्रश्न उद्भवत होता. त्यामुळे आम्ही फायबर टेक्नोलॉजीवर काम करायचं ठरवलं’ असं स्टार्टअप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करम लक्ष्मण यांनी इंडिअन एक्सप्रेसच्या संकेत स्थळाला सांगितलं. ‘कनेक्शनमधील समस्या आणि महागडं इंटरनेटचं कारण ‘फायबर’मध्ये आहे असं काही महिन्यांच्या अभ्यास आणि अनुभवातून लक्षात आलं. फायबर ही मुख्य समस्या कळल्यानंतर त्याच्या विकास करण्यास सुरुवात केल्याचं करम यांनी सांगितलं. थर्डपार्टी हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ब्रॉडबँडची किंमत अनेकदा खूप महाग ठरते. तेव्हा आम्ही थर्डपार्टी हार्डवेअर, सॉप्टवेअर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यांवर अवलंबून नाही. स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वतंत्र सेवा आम्ही उपलब्ध करून दिली, असंही त्यांनी सांगितलं. ही सेवा वापरण्यासाठी कोणीही ग्राहक वायफाय डब्ब्याचा सिग्नल वापरू शकतो आणि त्याच्या मोबाईल नंबरने लॉगिन करू शकतो. 1 रुपयात 1 जीबी डेटा सध्या आम्ही देऊ करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. ‘सुपरनोड्स’चा लेझर तंत्रज्ञानावर ही सेवा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, अधिक वेगवानसेवा देणं शक्य होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. घरगुती वापरकर्त्यांनी कनेक्शन जोडण्यासाठी ओटीपीचा वापर करावा लागतो. ही सेवा अगदी स्वस्तात इंटरनेट उपलब्ध होते. तसेच आम्ही काही ऑफरही देऊ करतो, त्यात डेटा सेव्हर, अँटी-व्हायरस मागणीनुसार उपलब्ध होतो, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here