जानेवारी रोजी सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजित स्ट्राँग वूमन पॉवरलिफ्टिंग आणि भंडारी श्री शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उपस्थित होते. तर भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते तर भैरी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन केले. सुमारे १० वर्षांनी केवळ महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत कु. अनुजा सावंत हिने रत्नागिरी जिल्ह्याची स्ट्रॉग वुमन होण्याचा बहुमान मिळवला, भंडारी श्री २०२० शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी नाट्यगृह येथे प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. भंडारी श्रीमान होण्याचा मान श्री. भाई विलणकर यांनी मिळवत सुवर्ण पदक, चषक व रोख रक्कम तर संदेश चव्हाण यांनी द्वितीय देत रौप्य पदक, चषक रोख रक्कम व प्रमोद नाखरेकर तृतीय येत कांस्य पदक, चषक रोख रक्कम मिळविली. खुल्या गटात घेण्यात आलेल्या भंडारी मसल मेनियाचा विजेता एन.एस.जी जिम चिपळूणचा आकाश मोहन पाटील याने आपले नाव चषकावर कोरले. भंडारी श्री खुल्या गटामध्ये फ्लेक्स जिमच्या शाश्वत शंकर मानकर हे भंडारी श्रीचे किताब विजेते ठरले. भंडारी श्री २०२० चा मानकरी क्रीडा संकुल जिम मारुती मंदिरच्या श्री. मिनार वायांगणकर याने चांदीची गदा, सुवर्ण पदक व रोख रक्कम व चषक मिळवण्याचा मान पटकावला. तर रत्नागिरी फिटनेस स्टुडियोच्या रोहन शिर्धनकर याने उपविजेतेपद पटकावले. बेस्ट पोजरचा बहुमान एन एस जी फिटनेस चिपळूण चा समीर मोरे तर भंडारी श्री उगवता तारा सीलायन फिटनेस नाटेच्या सिकंदर कनगुटकर याने पटकावला. या स्पर्धेच्या न्यूट्रिशन पार्टनर प्रोब्रस्ट तर्फे सर्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धक तसेच भंडारी श्री च्या सर्व विजेत्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या. खास आकर्षण मिस इंडिया हर्षदा पवार हिची शो पोजिंग पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी नाट्यगृह येथे तोबा गर्दी केली होती. तर तनमयी देसाई चिपळूण हिने सुद्धा डासिंग शो पोजिंग करत स्पर्धा प्रेमींसमोर संदर प्रदर्शन केले. मंबई हन प्रमख पाहणे म्हणन आलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टर अक्षता मिठबावकर हिने सर्व महिला पॉवरलिफ्टर ना मार्गदर्शन केले तर सेलिब्रिटी ट्रेनर, फिटनेस गुरू मनीष आडविलकर यांनी भंडारी श्री स्पर्धा ही एक सर्वोत्तम नियोजन आणि बक्षिसांची लयलूट करणारी आणि बॉडिबिल्डरना मान देणारी स्पर्धा असल्याचे म्हणत भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश चंद्रकांत नार्वेकर, कमिटी अध्यक्ष श्री. चेतन मयेकर, उपाध्यक्ष अभिजित विलणकर व सर्व सदस्यांचे कौतुक आणि आभार मानले.
