पेढांबे ब्रीज व कापसाळ येथे हातभट्टीवर छापा; दोघांवर गुन्हा दाखल

0

चिपळूण : तालुक्यातील पेढाबे ब्रिजजवळ झडपामध्ये गावठी हातभट्टीची दारू विकताना पोलिसांनी एकाला अटक केली आहे. श्रीकांत लक्ष्मण शिगवण (४९, रा. पिंपळी बु.) असे आरोपीचे नाव आहे. या बाबत पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश क्षिरसागर यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. ११ रोजी सायंकाळी ४:१५ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ९८८ रूपयांची दारूच्या १९ बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत कापसाळ टेपरवाडी येथे धाड टाकली. या प्रकरणी प्रसाद राजाराम कांबळी (रा. कापसाळ टेपरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ६२० रुपयांची गावठी हातभट्टी आढळून आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here