अलर्ट! मुंबईत पोहोचला कोरोना व्हायरस

0

चीनमध्ये आणि तिथून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हारसचे 2 संशयित रुग्ण मुंबईत दाखल झाले आहेत. चीनहून मुंबईत परतलेल्या दोघांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णासाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र सध्या त्यांना रुग्णांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टरांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं आहे. चीनहून मुंबईत परतलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्यास तात्काळ महापालिका प्रशासनाला कळवून विशेष वॉर्डमध्ये भरती करावं, अशा सूचना मुंबई पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसबाबत राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here