“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

0

नवी दिल्ली देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा भार आला आहे. काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. मुंबई, दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. वाढत्या इंधन दरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारमध्ये फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे” असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तसेच गडकरींमध्ये हिंमत आहे. यामुळे त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद करायला हवा असं देखील म्हटलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात स्वीकार केलं होतं. त्यावर चिदंबरम यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्र सरकारमधील सर्व निर्णय हे पंतप्रधान मोदी घेतात हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. यामुळे कोण अर्थमंत्री आहे आणि कोण नाही, याला काही अर्थ उरत नाही. पंतप्रधान स्वतः अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि क्रीडामंत्री आहेत. तेच सर्वेसर्वा आहेत. पण केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्येच हिंमत आहे. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. पण सध्या तेही गप्प आहेत. त्यांनी आपला आवज उठवला पाहिजे. त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद केला पाहिजे” असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here