भारताचा न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय

0

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना इडन पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 19 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. भारताकडून केएल राहुलने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. तसेच त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर 99 धावांची भागीदारीही रचली. विराटने 45 धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या. त्याला मनिष पांडेने नाबाद 14 धावा करत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना इश सोधीने 2 विकेट्स घेतल्या. तर मिशेल सँटेनर आणि ब्लेअर टिकनेरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी न्यूझीलंडकडून कॉलीन मुन्रो(59), केन विलियम्सन(51) आणि रॉस टेलर(54) यांनी अर्धशतके करत न्यूझीलंडला 5 बाद 203 धावसंख्येवर पोहचवण्याच महत्त्वाचा वाटा उचलला होता. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here