चिपळूणात पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

0

चिपळूण : तालुक्यात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. असे असताना सोमवारी झालेल्या पावसामुळे वाघिवरे नदीची पाणी पातळीही वाढली आहे. या नदीवर विकास शांताराम खडपेकर (४८, रा. वाघिवरे, चिपळूण) हे सोमवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेनंतर नदी परिसरात त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here