महाड : महाड येथील सावित्री, गांधारी नदी पात्रामध्ये मोठ्या संख्येने मगरींचे वास्तव्य आहे. शहरात मागील आठ दिवसांपासून नागरी वस्तीत मगरी येत असून त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. नुकत्याच शहरात आलेल्या पुराच्या पाण्यातून मगरी आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यासंदर्भात वन खात्याकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.दहा बारा वर्षांपूर्वी महाड शहराच्या बाजूने वाहणाऱ्या सावित्री नदीमध्ये तुरळक संख्येने असलेल्या मगरींच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली. यामुळे नागरीकांना बसण्याची शक्यता आहे.
