कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असून जिल्हा नियोजनाबाबत ही बैठक झाली. जिल्हा विकासासाठी निधी देताना मानवविकास निर्देशांक, लोकसंख्या क्षेत्रफळ, शहर आणि ग्रामीण याबाबी लक्षात घेतल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांसाठी विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
