रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उद्या चिपळूणात

0

महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा चिपळूणच्या स्व. लक्ष्मीबाई बाव्यासाहेब माटे संकुलाचा पाचवा वर्धापन दिन व चिपळूण शाखेचा वर्धापन दिन सोहळा २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कापसाळ येथील गवळी समाजाच्या संकुलात सकाळी ८.३० वाजता अभिषेक, ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११ वाजता मान्यवरांचा सत्कार व समाजातील गुणवंत ज्येष्ठविद्याथ्यांचा गुणगौरव होईल. दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू ,६ वाजता हरिपाठ तर रात्री ९ वाजता उदयानंदगिरी-विद्यानंदगिरी मंडळ चिपळूण यांचा नमनाचा कार्यक्रम होईल. हा सोहळा मुंबई शाखेचे अध्यक्ष अशोक दाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी खासदार सुनील तटकरे, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अमेव घोले, आ. रमेश लटके, आ. अनिकेत तटकरे, चिपळूणचे नगरसेवक निशिकांत भोजने, अविनाश केळकर, मोहन मिरगल, उद्योजक मनोहर वाजे, अनिल चिले, जयंद्रथ खताते, विजय माटे, शंकर माटे, जि.प. सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे, उद्योजक चंद्रकांत भोजने, एकनाथ काळे, किसन माटे, रघुनाथ मिरगल, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष विजय खेडेकर, चिपळूण शाखेचे कार्याध्यक्ष नितीन ठसाळे यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here