शिवसेना उप तालुकाप्रमुखाने दिली पत्रकाराला ठार मारण्याची धमकी

0

प्रशासकीय कामकाजाची माहिती मागितली म्हणून गुहागर शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख असलेले बाबू सावंत यांनी पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुहागर मध्ये घडली आहे. यासंबंधी बाबू सावंत यांच्या विरोधात गुहागर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गुहागरमधील जामसूद आणि वेळंब तर्फे पांगारी या दोन ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी एका ठेकेदाराला त्याने काहीही काम न करता लाखोंची कामं केल्याचा दाखला दिला असल्याची माहिती पत्रकार स्वप्नील घाग यांना समजली, सदर माहिती खरी आहे का याची चौकशी करण्यासाठी स्वप्नील घाग यांनी गुहागरचे गटविकास अधिकारी मोहिते यांना विचारले. यावर त्यांनी, आपण माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. मात्र मोहिते यांनी फोन केल्याच्या नंतर काही काळाच्या फरकाने बाबू सावंत यांनी घाग यांना परस्पर फोन करून तू गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती का मागितली असा दम भरत जर तू हे प्रकरण बाहेर काढलस तर तुला मी काय आहे. हे दाखवतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्वप्नील घाग यांनी गुहागर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा मराठी पत्रकार परिषदेने जाहीर निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here