मुंबई दापोली एसटी बस पुलावरून कोसळली, २० जण जखमी

0

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असलेल्या कळमजे पुलावरून एसटी बस खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून ही बस दापोलीकडे जात असतानाच पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस पुलाचा कठडा तोडून पुलावरून खाली कोसळली. या बसचा क्रमांक एमएच १४-बीटी-०४१३ असा आहे. ही बस दापोली डेपोची आहे व मुंबईतील परळ डेपो येथून ही बस दापोलीला जात होती. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते, असे एसटीकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here