मीना रिसबूड यांना क्रांतीज्योती फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान

0

रत्नागिरी येथील आनंदीबाई प. अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम गणपतीपुळे येथे झाला. सौ. रिसबूड व प्रकाश रिसबूड यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी आविष्कारचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, कोकण विभागीय अध्यक्ष विजय केळकर, संस्थापक सचिव पी. एस. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर व पदाधिकारी, सहशिक्षिका, सेविकांनी रिसबूड यांचे अभिनंदन केले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here