आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण मार्गावर विशेष 24 गाडय़ा

0

आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण मार्गावर 24 विशेष गाडय़ा चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. एलटीटी, पनवेल ते सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी दरम्यान 31 जानेवारीपासून या विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. त्यांचे आरक्षण 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या गाडय़ा रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली स्थानकांवर थांबतील. कोकण रेल्वेतर्फे ही माहिती देण्यात आली. एलटीटी-सावंतवाडी (गाडी क्र. 01161/01162, 01037 / 01038), एलटीटी-थिवी ( 01157/01158), थिवी-पनवेल (01160/01159), एलटीटी-करमळी (01051/ 01052), करमळी-पनवेल (01016/01015) या विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here