कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात संपविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करणार : जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील

0

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे आहे. महिनाभरात दुसरी लाट संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प रत्नागिरीचे नवीन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ते म्हणाले, रत्नागिरीत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणात वाढ आणि पाॅझिटिव्हिटी कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी वाॅर रूम तयार करून चर्चा करणार. दर दिवशी कोरोनाच्या १० हजार चाचण्या करण्यावर भर देणार, यासाठी आरटीपीसीआरवर अधिक भर देणार. अत्यावश्यक असेल तेथेच ॲंटिजन करणार. सध्या आरटीपीसीआर १००० पर्यंत होतात, त्या दरदिवशी २५०० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांत चाचण्या होणार असून दररोज याबाबतचा आढावा घेतला जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली. काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देणार असून त्यासाठी हाय रिस्क आणि लो रिस्क असे दोन विभाग करणार, डेरवण येथील खासगी मेडिकल कॉलेजला हजार चाचण्या करते, त्यांनाही परवानगी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव ही योजना कोरोना हाॅटस्पाॅट गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या सहकार्याने प्रभावीपणे राबविणार. रत्नागिरी जिल्ह्यातील गावे जास्तीत जास्त कोरोनामुक्तीची बक्षिसे जिंकतील, यासाठी प्रयत्न करणार. लोकांमध्ये याबाबत जागृती झाली तरच कोरोनाची दुसरी लाट कमी होईल, असे ते म्हणाले. पर्यटकांची तसेच सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्यांची सक्तीची चाचणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:05 AM 17-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here