रत्नागिरी : रत्नागिरी जयगड रोडवर मासेबाव येथे एका अज्ञात ट्रकने दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांना धडक देत पलायन केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. या अपघातात गणपतीपुळे ते कोल्हापूर असा प्रवास करीत असणारे नितीन मधुकर रासाटे, रा. कोल्हापूर व निवास तानाजी कांबळे, रा. कोल्हापूर हे जखमी झाले आहेत. ट्रकने या दुचाकीला धडक देऊन पलायन केले असल्याने या अज्ञात ट्रकच्या चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 17/Jul/2021