मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली आहे. पश्चिम दृतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. मुख्य मार्गावरील अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली या भागात वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहने सथ गतीने हळूहळू पुढे सरकत आहेत. पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक मार्ग जलमय झाले आहेत. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक देखील खोळबंली आहे. यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी वाहतूक दारांना वाहतूकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक मार्गावर वाहतूकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक मुख्य ठिकाणी मध्यभागी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना कसरत करतच गाडी चालवावी लागत आहे. सध्या वाहतूक पोलिसांमार्फत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
