जगबुडी नदीवरील देवणे बंदर लवकरच जगाच्या पर्यटन नकाशावर झळकणार

0

खेड : खेड शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या जगबुडी नदीला आता पर्यटनदृष्ट्या वेगळा साज चढणार आहे. या नदीवर असलेल्या परंतु सध्या गाळात रुतलेल्या देवणे या बंदराच्या विकासासाठी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने तब्बल 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याने हे लवकरच जगाच्या पर्यटन नकाशावर झळकणार आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमुळे खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.

खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतून पूर्वी गलबतांच्या माध्यमातून व्यापार चालत असे. वेगवेगळ्या प्रकारचा माल भरलेली गलबते जगबुडी नदीवरील देवणे बंदरात लागत असत. इथे गलबतांमधील माल उतरल्यानंतर तिथून तो शहरात आणि तालुक्यातील अन्य गावांमध्ये वितरित केला जात असे. त्यामुळे हे बंदर नेहमीच गजबजलेले पहावयास मिळत असे. काळाच्या ओघात गलबतांमधून होणार व्यापार कालबाह्य झाला आणि खेडचे देवणे बंदर ओस पडले. अनेक वर्ष दुर्लक्षित राहिल्याने देवणे बंदर गाळात रुतले आणि या बंदराकडे कुणी फिरकेनासे झाले. खेडमध्ये देवणे नावाचे एक बंदर आहे आणि या बंदरातून पूर्वी व्यापार चालत असे याचाही विसर पडला मात्र आता हेच बंदर पर्यटनाचा नवा साज चढवून पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. या बंधाऱ्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच येथील डोहात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जगबुडी नदीचा देवणे हो डोह खोल आणि विस्तीर्ण आहे. सद्यस्थितीत या डोहात अनेक महाकाय मगरींचा वावर आहे. दुपारच्या उन्हामध्ये डोहातील अनेक मगरी नदीकिनारी असलेल्या खडकावर पहुडलेल्या पहावयास मिळतात एकाद्या पाळीव जनावराची किंवा माणसाची चाहूल लागली की खडकावर पहुडलेल्या मगरी विद्युत वेगाने डोहामध्ये झेपावतात. देवणे डोहामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असल्याने या ठिकाणी क्रोकोडाईल पार्क करण्यात येणार आहे. या ठिकाणी जे पर्यटक पर्यटनासाठी येतील त्या पर्यटकाना बंदिस्त बोटीतून डोहात विहार करण्याऱ्या मगरीचे दर्शन घडविले जाणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी सर्व सोयी आणि सुविधांनी सज्ज असणारे क्लबहाऊस बांधण्यात येणार आहे. राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने या कामासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कमला सुरवात होणार असल्याने गाळात रुतलेला खेडचे देवणे बंदर जगाच्या पर्यटन नकाशावर झळकणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:03 PM 17-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here