राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक २५ व २६ जानेवारी २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी रात्री ९.३० वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व मुक्काम.रविवार दिनांक२६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८.३० वा. शासकीय विश्रामगृह, ओसोर, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण, सकाळी ९.१५ वा. ते १०.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे प्रजासत्ताक दिनांचा ७० वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी १०.३० वा. ग्रामिण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यांच्या व्यापारी गाळा येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, ११.०० वा. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान संचलित छत्रपती शिवाजी महाराज कृषि महाविद्यालयास सदिच्छा भेट, दुपारी १.०० वा. ओरोस येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी २.००वा. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ३.०० वा. वेंगुर्ला येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण करणार.
