कोरोना विषाणूंनी बाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा चीनमध्ये शनिवारी मृत्यू झाला. या विषाणूने घेतलेला वैद्यकीय क्षेत्रातील हा पहिला बळी आहे. चिनच्या हुबेई प्रांतात या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. याच प्रांतात या विषाणू बाधीतांची संख्या सर्वाधिक आहे. या मृत्यूबरोबर यामुळे बळी पडलेल्यांची संख्या 41 वर पोहोचली आहे. चीनमध्ये या विषाणूंची बाधा झालेल्यांची संख्या एक हजार 287 आहे. त्यातील 237 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. लियांग वुडोंग वय 62 असे मरण पावलेल्या सर्जनचे नाव आहे. शनिवारी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांना गेल्या आठवड्यात या विषाणूंची बाधा झाली होती.
