रायगड पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित जिल्हा, सामाजिक संस्थेने सादर केला शोध अहवाल

0

रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, जिल्ह्यात येणारे पर्यटक यांचा जिल्हा पोलिसांविषयी असणारा दृष्टीकोन काय आहे याबाबत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता. सतरंगी सामाजिक गटातर्फे हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये रायगड हा सुरक्षित जिल्हा असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे हे शक्य झाल्याचं अहवाल सादर करणाऱ्या संस्थेने म्हटलं आहे. हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे सोपवण्यात आला. स्थानिक पातळीवर कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा सुचविणे हे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट्ये होता असे प्रा. अमेय महाजन यांनी सांगितले. रायगड हा पर्यटकांना आकर्षित करणारा जिल्हा असून, लाखो पर्यटक हे दररोज इथे येत असतात. मुंबईपासून जवळ असल्याने आणि जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे असल्याने पर्यटकांची संख्या ही जास्त असते. यामुळे इथल्या पोलिसांवर स्थानिक गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासोबत पर्यटकांना आणि पर्यटकांकडून स्थानिकांना त्रास होणार नाही याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं. कामाचा ताण असूनही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडत असल्याचं अहवालात दिसून आलं आहे. या शोधामध्ये पर्यटकांकडून त्यांचा अभिप्राय मागवण्यात आला होता. याशिवाय सामान्य नागरिकांकडून रायगड पोलिसांबद्दलचा दृष्टीकोण समजून घेतल्यानंतर अहवाल तयार करण्यात आला. या अभ्यास समितीने काही शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसी अंमलात आणल्यास सामान्य नागरिक आणि रायगड पोलीस यांच्यात सुसंवाद वाढण्यास मदत होईल असं अहवाल तयार करणाऱ्यांनी म्हटले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here