खेडमध्ये पुराचा धोका

0

खेड : तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, रविवारी नदी-नाले व गटारे ओसंडून वाहत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून रविवारी नदीच्या पाण्याची पातळी ५.६० मीटर एवढी नोंदवण्यात आली आहे. पाऊस कायम राहिला तर रात्री जगबुडी नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे खेड शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून गटारे देखील तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील तीनबत्ती नाका, कॅफे कॉर्नर, महाडनाका या परिसरात गटारे ओसंडून वाहू लागल्याने खेड-भरणे व खेड-दापोली मार्गावर पाणीच पाणी साचले होते. तालुक्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली असल्याने धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. परिणामी मुसळधार पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे शहरात केव्हाही पुराचे पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खेड न.प.ने नदीकाठी असणाऱ्या लोकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here