आरती देशमुख यांच्याकडून ईडीकडे कागदपत्रे सुपुर्द

0

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी ईडीला आवश्यक असलेली कागदपत्रे सुपुर्द केली आहेत. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीच्या रडारवर असलेल्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येत आहे. आरती देशमुख यांना १५ जुलैला ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे समन्स बजविले होते. मात्र, प्रकृती व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या हजर राहू शकल्या नव्हत्या. त्याऐवजी त्यांनी आवश्यक दस्तऐवज देऊन चौकशीला सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार ईडीने अधिकृत व्यक्तीमार्फत कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्यानंतर ॲड. इंदरपाल सिंग यांनी शुक्रवारी संबंधित कागदपत्रे ईडी कार्यालयात सादर केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here