कार भाडयाने घेवून कारचालकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

0

रत्नागिरी येथून गाडी भाड्याने घेऊन साखरपा देवरुख रोडवर कारचालकला नेऊन त्याला दमदाटी करत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज अटक केली. या गुन्ह्याच्या वेळी आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने तोंडाला रुमाल बांधला होता. गुन्हयाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . शिरीष सासने यांनी तात्काळ एक पथक तयार केले होते. गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज चा आधार घेत पोलिसांनी हातखंबा परिसरातून प्रदिप चंद्रकांत पाटील रा . वालुर ता . शाहुवाडी कोल्हापूर , सध्या रा . नवनाथ चाळ , महाराष्ट्र नगर , मानखुर्द ( प . ) मुंबई याला ताब्यात घेतले. या आरोपीने रेल्वे स्टेशनवर एका महिलेची पर्स चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून एकूण ७ , ४३० / – रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याला पुढील कार्यवाहीसाठी देवरुख पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ . श्री . प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक श्री . विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . शिरीष सासने , पोउनि श्री . विकास चव्हाण , पोहेकॉ – संदिप कोळंबेकर , संजय कांबळे , राजु भुजबळराव , शांताराम झोरे , पोना – नितीन डोमणे , विजय आंबेकर , सागर साळवी , दत्ता कांबळे यांनी केलेली आहे .

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here