विकास व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य अपेक्षित : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

0

◼️ नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे भाजपने केले स्वागत, स्वागताप्रसंगी केली अपेक्षा व्यक्त

➡ रत्नागिरी : जिल्ह्यात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी विनंती द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली. आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन रत्नागिरीतील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अॅड. पटवर्धन यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोविडचा प्रकोप वाढत आहे. निर्बंधांमुळे अर्थचक्र पूर्ण विस्कळित झाले आहे. हे चक्र सुरळित करण्याकरिता जिल्हाधिकारी म्हणून ठाम निर्णय घ्यावा. कोविड उपचारांसाठी पूर्णवेळ फिजिशियनची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच आता गावोगावी कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावांतील ग्रामकृती दल सक्रिय करावीत, अशी विनंती अॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. याकरिता भाजपचे सक्रिय सहकार्य लाभेल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी नुसते प्रशासकीय काम करण्यावर समाधानी नाही तर विकासाचे व्हिजन घेऊन काम करणार आहे. त्यासाठी रत्नागिरीकरांनी व भाजपने रचनात्मक सहकार्य द्या, असे आवाहन केले. या भेटीवेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर आणि तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here