‘मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका’ – राज ठाकरे

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी, ‘मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका. हा मान फक्त बाळासाहेबांचा’ असल्याची, सूचना केली आहे. २३ जानेवारीच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. ९ फेब्रुवारीला मनसेचा आझाद मैदानात मोर्चा आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील घुसखोरांच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत शॅडो कॅबिनेटबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असल्याचंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here