मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच अदानींनी मुख्यालय अहमदाबादला हलवलं

0

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबई त तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबाद मध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे.

मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुंबई विमानतळावर दांडियाच्या गाण्यावर फ्लॅशमॉब
मुंबई विमानतळाचा ताबा हा अदानी कंपनीकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका झाली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी या विमानतळाचा ताबा अदानींना मिळाला. त्यानंतर अवध्या आठवड्याभरातच विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर सोमवारी दांडियाच्या गाण्यावर करण्यात आलेल्या फ्लॅशमॉबवरही टीका झाली होती.

अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख सहा विमानतळांचा ताबा आहे. त्यामध्ये लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरु या विमानतळांचा समावेश आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी विमानतळांवर येणारे 25 टक्के आणि भारताच्या विमान वाहतुकीच्या 33 टक्के नियंत्रणाखाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here