देशात 24 तासांत कोरोनाचे 30,093 नवे रुग्ण; 374 जणांचा मृत्यू

0

देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के आहे. देशात काल (सोमवारी) 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी आणि आतापर्यंतची लसीकरणाची आकडेवारी.

आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर पोहोचला आहे. अशातच सोमवारी 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण 4 लाख 14 हजार 482 वर पोहोचली आहे. देशात 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 6 हाजर 130 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 52 लाख 67 हजार 309 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 41 कोटी 18 लाख 46 हजार 401 वर पोहोचला आहे.

आयसीएमआरनं ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरससाठी 17 लाख 92 हजार 336 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 44 कोटी 73 लाख 41 हजार 133 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here