संगमेश्वरमध्ये कडवई-कुंभारखाणी बुद्रुक मार्गावर कोसळला भलामोठा दगड

0

संगमेश्वर : तालुक्यात गेले चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कडवई-कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावर टेकडीवरून भलामोठा दगड कोसळला आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. छोट्या वाहनांनाही भीती निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली घनदाट झुडपे आधीच अपघातास कारणीभूत ठरत आहेत, त्यात गावकरवाडी कोंडराई येथे रस्ता मोठ्या प्रमाणावर उतरल्यामुळे देखील अपघाताची संभावना वाढली आहे. मुसळधार पावसामुळे येथील मार्गावर टेकडीवरून मला मोठा दगड कोसळल्याने अवजड वाहतूक थांबली आहे. संबंधित विभागाने सदरचा भलामोठा दगड बाजूला करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी प्रवासी वर्ग व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here