…म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे जाहीर आभार

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. डोंबिवलीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्यानंतर राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

डोंबिवली पूर्व परिसरातील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह हिरवा झाला होता. हा हिरवा प्रवाह पाहून नागरिकांना लगेच कळाले की हा पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नसून प्रदूषित पाण्याचा प्रवाह आहे. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या प्रकरणाची कल्याण डोंबिवली आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या प्रकरणी एमआयडीकडे संपर्क साधला असता एमआयडीसीने या प्रकरणी रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी सूचना आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here