शिवभोजन थाळी उपक्रमाचा रत्नागिरीत आरंभ

0

राज्य शासनाच्या शिवभोजन थाळी उपक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आला. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीत जिल्हा रुग्णालय, एसटी बसस्थानकाजवळ हॉटेल मंगला आणि रेल्वे स्थानकावर नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत शंभर थाळ्या उपलब्ध होतील. शिवभोजन थाळीची किंमत फक्त दहा रुपये आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य व्यक्तींची भूक शमविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here